धरणगावात "फुले दाम्पत्य सन्मान दिन "निमित्त रंगभरण स्पर्धा !
धरणगांव - शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे १ जानेवारी फुले दांपत्य सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कलाशिक्षक एच डी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगभरण स्पर्धा घेण्यात आली यामध्ये लहान गट पाचवी ते सातवी व मोठा गट आठवी ते दहावी असे गट तयार करण्यात आले.
मोठ्या गटाला सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले व लहान गटाला ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे चित्र रंगवायला दिले होते चित्र रंगवुन मुलांनी फुले दांपत्याच्या शैक्षणिक - सामाजिक कार्याला अभिवादन केले. एक जानेवारी निमित्त भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या वीर शुरविरांना नमन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, ज्येष्ठ शिक्षिका एम के कापडणे तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी उपस्थित होते स्पर्धा यशस्वीतेसाठी एच डी माळी व पी डी पाटील यांनी सहकार्य केले.
Post a Comment