विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा महोत्सव; गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले


पी आर हायस्कूल येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात


( धरणगाव प्रतिनिधी ) धरणगाव : आपण दररोज शरीरासाठी काही वेळ दिला पाहिजे, प्राणायाम, व्यायाम यातून आपण मानसिक शारीरिक दृष्ट्या सक्षम होतो आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा महोत्सव महत्वाचा आहे. अभ्यासासोबत क्रीडांगण गाजवणारा विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहत नाही. खेळातून अपयश पचविण्याची क्षमता आणि खिलाडू वृत्ती जोपासली जाते असे मत धरणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी डॉ सौ भावना भोसले यांनी व्यक्त केले. येथील पी आर हायस्कूल येथे वार्षिक क्रीडा महोत्सव चे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू संजय पाटील (जळगाव), पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी होते. विचार मंचावर संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, मुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ, डी एस पाटील, डॉ. बापू शिरसाट, क्रीडा शिक्षक डी एच कोळी, वाय ए पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपली क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबाबतचा अनुभव व माहिती देत मार्गदर्शन केले. शिवाय विद्यार्थ्यांसाठी आपण करत असलेल्या विविध खेळांच्या संदर्भात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्थळावरचे प्रयत्न सांगितले या शाळेला महिन्यातून एक दिवस विविध खेळाचे मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचे श्री.पाटील यांनी आश्र्वासित केले. पोलीस निरीक्षक पवन देसले, डॉ अरुण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मैदानी खेळांचे महत्त्व पटवित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ आशा शिरसाट, सूत्रसंचालन गोपाल चौधरी तर आभार डी एच कोळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील  शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


धरणगाव पी आर हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवात क्रीडा ज्योत पेटवताना गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले, संजय पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, डॉ. मिलिंद डहाळे, डी एस पाटील आदी.

0/Post a Comment/Comments