ना. गुलाबराव पाटलांचा राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे जोरदार स्वागत व सत्कार


ना. गुलाबभाऊंच्या सत्कारासाठी ढोल ताश्याचा गजरात दिव्यांग बांधवांची रॅली..


(धरणगाव प्रतिनिधी)  धरणगाव : राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच खान्देशात दाखल झालेले राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ धरणगाव तालुक्याचा वतीने जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला. ना. गुलाबभाऊंच्या स्वागतासाठी धरणगाव तालुक्यातील राष्ट्रीय अपंग महासंघाचे (दिव्यांग) तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजरात मोठ्या उत्साहात रॅली काढत गुलाब भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. च्या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला. ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार प्रसंगी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील, राजू चौधरी, रविंद्र काबरे, देवा महाजन, प्रमोद सुतारे,  रमेश चौधरी, जगतराव पाटील, लालचंद पाटील, बाबुलाल पाटील, लीलाधर नन्नवरे, आनंद पाटील, जितेंद्र पाटील, कैलास पाटील, बाळासाहेब, दादूभाऊ यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना.पाटील यांचा उत्साहात सत्कार सन्मान केला. यावेळी धरणगाव तालुका अपंग महासंघ यासह विविध सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांनीही हजेरी लावली होती.

0/Post a Comment/Comments