(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : सांगली जिल्ह्यातील जत येथे गोपीचंद पडळकर यांच्यासाठी महायुतीच्या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावरुन टीका केली. शरद पवार यांच्या बाबतीत केलेले बेताल सदाभाऊ खोतांनी आपल्या संकुचित वृत्तीचे जाहीर प्रदर्शन केले. पडळकर यांच्या सभेवेळी भाषणात सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना व्यंगात्मक आणि एकेरी शब्दात संबोधून त्यांच्या व्यंगावर जाहीर टीका केली आणि असंस्कृत प्रवृत्तीचे दर्शन घडवीले.
पवारसाहेबांना मानावं लागेल, कारण ते म्हणतायत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय.कसला? तुला तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का?" असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर व्यंगात्मक पद्धतीने टीका केली. शारीरिक व्यंगावर केलेले वक्तव्य हे फक्त शरद पवारांवर नसून सकल दिव्यांग बांधवांचा केलेला अपमान आहे. अश्या निर्लज्जपणाने उथळ प्रवृत्तीच्या व बेगडी प्रसिद्धीचा हव्यास असणाऱ्या सदाभाऊ खोतचा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी हाताच्या दंडावर काळी फित लावून जाहीर निषेध केला.
लोकशाहीत सत्ताधारी व विरोधक यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र शारीरिक व्यंग यांच्यावर टिप्पणी करणे निषेधार्य मानले गेले आहे. याप्रकरणी ह्या बेताल वक्तव्य करणारा सदाभाऊ खोत यांनी सकल दिव्यांग जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी धरणगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांनी केली आहे.
Post a Comment