(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : शहरात दि. ०३ सप्टेंबर २०२४ वार - मंगळवार रोजी मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ सर्व समाज अध्यक्ष, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शिवप्रेमींच्या उपस्थितीत निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले. या घटनेची दखल प्रिंट व डिजिटल मीडियाने चांगल्या प्रकारे घेऊन व्यापक प्रसिध्दी दिली परंतु "दैनिक लोकमत" या वृत्तपत्रात याबाबत बातमी प्रसिध्द झाली नाही. राजेंचा कार्यक्रम जो सर्वपक्षीय व सर्वसमावेशक होता २ दिवस झाल्यानंतर देखील राजेंच्या कार्यक्रमाची दखल या वृत्तपत्राला घ्यावीशी वाटत नसेल तर हे अतिशय निंदनीय आहे. सातत्याने आकसापोटी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा प्रकारची सावत्र वागणूक लोकमत कडून दिली जाते. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे पध्दतशीरपणे डोळेझाक केली जाते. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडी धरणगाव च्या वतीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ लोकमत पेपरची होळी (जाळण्यात) करण्यात आली.
याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करत सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकमत वृत्तपत्राचा निषेध केला. याप्रसंगी भावना व्यक्त करतांना राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून मिरवणाऱ्या लोकमतला जर मराठी अस्मितेचा स्वाभिमान असलेले छत्रपती शिवरायांच्या बातमीची दखल घ्यावीशी वाटत नसेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. उबाठा सेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, सर्व समाज अध्यक्ष - पंचमंडळ, सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना व शिवप्रेमींनी मालवण येथील घटनेचा निषेध केला. याची नोंद सर्व माध्यमांनी घेतली परंतु लोकमत ने घेतली नाही म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने लोकमत जाळला. राजेंच्या बातमीची दखल न घेता व्यावसायिक पत्रकारिता करणाऱ्या लोकमत चा आम्ही निषेध करतो. यापुढे जर लोकोपयोगी उपक्रमांची दखल लोकमत ने घेतली नाही तर आम्ही घरोघरी जाऊन लोकमत पेपर घेऊ नका याबाबत आवाहन करू, असे श्री. वाघ म्हणाले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, उबाठा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अँड शरद माळी, शहराध्यक्ष भागवत चौधरी, शेतकरी सेना ता प्रा.विजय पाटील, विभाग प्रमुख रमेश पांडे, किरण अग्नीहोत्री, माजी नगरसेवक जितू धनगर, किरण मराठे, युवा सेना शहर प्रमुख परमेश्वर महाजन, संतोष सोनवणे, सुनील चव्हाण, आनंद धनगर, वसिम कुरेशी, गजू माळी, भिमराव धनगर, विलास पवार, रामचंद्र माळी, दिनेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाचे गोपाल पाटील, भगवान शिंदे, नारायण चौधरी, खलील (बंटी) खान, रमेश माळी, गोपाल माळी, राहुल पाटील, रामकृष्ण (वासू) मराठे, प्रफुल पवार, सागर महाले, रमजान शाह, दुर्गेश चौधरी, भैय्या धनगर, भा.रा.काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष भूषण भागवत आदी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment