धरणगाव येथील कुणबी पाटील पंच मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार


धरणगाव : येथील लहान माळी वाडा परिसरातील गायत्री गणेश पाटील हिने दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण संपादन करत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तसेच अर्चना भिकन पाटील हिने एम कॉम ला ०८.९४ (CGPA) गुण मिळविल्याबद्दल दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींचा समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, समस्त कुणबी पाटील पंच मंडळाचे संचालक गणेश विठ्ठल पाटील यांची सुकन्या गायत्री हिने नुकताच जाहीर झालेल्या दहावीच्या शालांत परीक्षेच्या निकालात ९७.४० टक्के गुण संपादन करत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तसेच समाजाचे उपाध्यक्ष दिलीप जगन्नाथ पाटील यांची पुतणी तथा स्व.भिकन जगन्नाथ पाटील यांची सुकन्या कु.अर्चना भिकन पाटील हिने एम कॉम च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात ०८.९४% (CGPA) गुण मिळविले. या गुणवंत विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशाबद्दल समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने कु.गायत्री व कु.अर्चना यांना जगद्गुरू तुकोबांची गाथा, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष भिमराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते समीर भाटीया, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, खजिनदार लक्ष्मणराव पाटील, जेष्ठ संचालक चुडामण पाटील, कैलास पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, गणेश पाटील, किशोर पाटील, परशुराम पाटील, मोहन पाटील, आनंद पाटील, मंगेश पाटील, जितेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी गायत्रीला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

0/Post a Comment/Comments