निसर्गप्रेमी तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त १११ वृक्षांचे रोपण, मोरया मित्र मंडळाचे आदर्श उदाहरण

 


येत्या वाढदिवसापर्यंत ५५५ वृक्षारोपण करणार; तायडे


(धरणगाव|प्रतिनिधी)  धरणगाव : वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो त्यामुळेच वाढदिवस गरीब असो की श्रीमंत सर्वजण साजरा करतात. असाच अनोखा वाढदिवस येथील चिंतामण मोरया नगर मित्र मंडळाच्या वतीने मोरया नगरातील रहिवासी दिवंगत ॲड. विवेक पाटील, दिवंगत देवेंद्र पाटील, दिवंगत देविदास पाटील, दिवंगत दिनेश शिरसाठ यांच्या स्मरणार्थ निसर्गमित्र महेंद्र रुपचंद तायडे यांचा ३९ वा, वाढदिवसानिमित्त १११ वृक्षारोपणासह गावातील स्मशानभूमी व कब्रस्तान स्वच्छ करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सध्या तरुणाईमध्ये लग्नाचा किंवा स्वतःच्या वाढदिवसाची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्टी, धांगडधिंगा, फटाक्यांची आतिषबाजी करणे, भर रस्त्यावर केक कापून तो चेहऱ्याला फासून आजच्या तरुणांकडे पाहता पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण सुरू असल्याचे नित्याचे झाले आहे. मात्र याला अपवाद ठरवत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणिव ठेवीत समाजासाठी काही देणं लागतं ह्या शुद्ध भावनेपोटी धरणगाव येथील चिंतामणी मोरया नगरातील रहिवासी तथा स्टेट बँक ऑफ इंडिया जळगाव शाखेत कार्यरत असणारे, सामाजिक कार्यकर्ते, निसर्गप्रेमी महेंद्र रुपचंद तायडे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधत मोरया नगर व महेंद्र तायडे मित्र परिवाराकडून श्री.चिंतामण मोरया नगरात व मंदिराच्या परिसरात वड, पिंपळ, उंबर, कडूलिंब, बेल, आंबा, अशोक, जांभूळ, अर्जुन यांसह अन्य १११ वृक्षांचे रोपण करीत एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. तत्पूर्वी गावातील स्मशानभूमी व कब्रस्थान स्वच्छता करून वृक्षारोपण करीत सामाजिक समतेचा व एकात्मतेचा संदेश देत महेंद्र तायडे मित्र परिवाराकडून आदर्श पिढीचे दर्शन घडले आहे. वृक्ष हा मनुष्यजीवनाचा अविभाज्य घटक असून त्याशिवाय आपलं जगणं अशक्य आहे. कोरोनाच्या महामारीत आपले जवळचे कित्येक जण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्याला सोडून गेलेत. या गोष्टीच्या विचार करून सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाडे लावून मोरया नगरातील दिवंगत मित्रांना अभिवादन म्हणून श्री. तायडे यांचा अनोखा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प मित्र परिवाराकडून करण्यात आला. वृक्षारोपणास प्राची अर्थ मुव्हर्स चे संचालक भैय्या मराठे, नगरसेवक कैलास माळी सर, ललित मराठे, किशोर खैरणार, गणेश मराठे, राजेंद्र वाघ आदींचे अनमोल सहकार्य लाभले. आजकाल वृक्षतोड वाढली आहे. परिणामी जंगलांचे व वृक्षांचे प्रमाण कमी होत चालले आहे. उन्हाळा आला की, सावलीसाठी मानवप्राणीसह मुकेप्राणी देखील सावलीचा शोध घेत असतो. वृक्ष झाडे हे असे आहेत जे कधीही काहीही मागत नाही आणि तरीही आपल्याला ऑक्सिजन इतके मौल्यवान घटक देतात आणि आपण चलता है ठीक आहे असे म्हणत दुर्लक्ष करत वृक्ष लावणं विसरतो. वृक्ष केवळ आपले जीवनच प्रभावित करतात असे नव्हे, तर ते आपले अस्तित्व सुरक्षा ठेवण्यासाठी संजीवनी प्रधान करतात मानवाची सेवा करण्यात निसर्गाचा फार मोठा सहभाग आहे. मानवाची निर्मिती देखील निसर्गातूनच झालेली आहे. मी माझ्या गावात माझ्या नगर परिसरातील वातावरण अधिकाधिक हिरवेगार बनवून मी स्वतःसाठी हे सर्वोत्तम करू शकतो आणि येत्या १७ जून, २०२५ पर्यंतच्या वर्षभरात अर्थातच येणाऱ्या वाढदिवसापर्यंत ५५५ वृक्ष लावणार असून सदरच्या वृक्षांचे महाकाय वृक्ष होईपर्यंत वृक्षांचे संवर्धन व निगा राखण्याच्या संकल्प निसर्गप्रेमी श्री. तायडे यांनी केल्याचे सांगितले. यावेळी दिपक सूर्यवंशी, उदय मोरे, चेतन सोनवणे, सागर ठाकरे, भूषण पाटील, आकाश साठे, आकाश बिवाल, मनोज गुजर सर, रमेश माळी, विजय सोनवणे, सुजल वाणी, अनंत धारणे, विजय महाजन, श्याम अहिरे, मयूर भामरे, संतोष सोनवणे, मुकेश लोहार, भटू चौधरी, विजय पाटील वेंडर, वैभव अमृतकर, मोनू पाटील, मुकेश भदाणे, निसर्गमित्र भरत शिरसाठ, चंदाताई पाटील, सुनील चौधरी, अमोल सूर्यवंशी, तेजस पाटील, नंदा महाजन, साई पवार, मुकेश लोहार, बंटी महाजन, दिव्येश मराठे, बापू मोरे, समाधान मराठे, धीरु अहिरे, राज पवार, यश पाटील, लेहरिकांत पितरोडा, सोहम पाटील आदी मित्रांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments