धरणगावात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिवप्रेमींकडून छ.शिवरायांना दुग्धाभिषेक

 



(धरणगाव| प्रतिनिधी)  धरणगाव : संपूर्ण देशातच नव्हे तर जगात सर्व शिवप्रेमींच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येत आहे. या पवित्र दिनाचे औचित्य साधून धरणगावात देखील शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमीत्त सकल शिवप्रेमी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला दुग्धाभिषेक करून माल्यार्पण करण्यात आले. स्वराज्याला सार्वभौम स्वतंत्र राज्य म्हणून सार्वत्रिक मान्यता देण्यासाठी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आवश्यक होता, म्हणून त्यांचा राज्याभिषेक ३५० वर्षांपूर्वी ६ जून, १६७४ रोजी झाला आणि ते शिवाजी महाराजांपासून छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला दुग्धाभिषेक व माल्यार्पण प्रसंगी शिवसेना उबाठा चे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे, भाजपचे नेते तथा गटनेते कैलास माळी, युवानेते चंदनराव पाटील, भीमराव पाटील, गुलाबराव मराठे, लक्ष्मणराव पाटील, समाधान मोरे, नामदेव मराठे, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रथम सूर्यवंशी, गोपाल पाटील, सिताराम मराठे, भागवत चौधरी, पत्रकार धर्मराज मोरे, राजेंद्र वाघ, अविनाश बाविस्कर, कल्पेश महाजन, योगेश पाटील, सचिन पाटील, गणेश मराठे, आनंद पाटील, योगेश मराठे, भैय्या मराठे, जगदीश मराठे, किरण अग्निहोत्री, ॲड.शरद माळी, ॲड.संदीप पाटील, ॲड. महेंद्र चौधरी, उद्योजक वाल्मीक पाटील, रणजित शिकरवार, संजय पवार, प्रेमराज चौधरी, अमोल चौधरी, सुमित मराठे, गौरव पाटील, योगेश वाघ, पुंडा नाना पाटील आदींसह असंख्य शिवप्रेमींनी अभिवादन केले.

0/Post a Comment/Comments