माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षानंतर आले एकत्र
(धरणगांव |प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सन १९९९ वर्ग १० वी च्या बॅचचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक प्रा.सतिश पारधी यांनी केले.या स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक वाय.एस.बडगुजर होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, एम के महाजन, एस आर महाजन, व्ही पी महाले, अनिल माळी, पी एस चौधरी, विद्यमान मुख्याध्यापक जे एस पवार, एच डी माळी,एम बी मोरे, एस व्ही आढावे, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, लिपिक जे एस महाजन,पी डी बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, सेवक मोरेदादा, जीवन भोई उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते आधुनिक भारताचे शिल्पकार राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर सर्व प्रमुख अतिथींचा १९९९ बॅच कडून पुष्पगुच्छ व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर १९९९ बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला. यामध्ये अधिकारी, उद्योगपती, प्राध्यापक, शिक्षक, व्यवसाय, शेती, कंपनी, महावितरण, एस टी महामंडळ अशा विविध क्षेत्रात या सर्व विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली होती याचे सर्व श्रेय आमच्या गुरुजनांचे आहे असे सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांच्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल २५ वर्षानंतर आम्ही एकत्र आलो. आजही आम्हाला आमच्या शिक्षकांचे शिकवणे, त्यांचे मारणे, बोलणे, रागावणे या सर्व गोष्टी आठवतात. आमच्या गुरुजनांचे मार्गदर्शनाने आज आम्ही सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रात काम करीत आहोत आणि माणूस म्हणून कार्यरत आहोत.
माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, एम के महाजन, एस आर महाजन, व अनिल माळी यांनी मनोगत व्यक्त करत सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी या स्नेह मेळाव्याचे कौतुक व अभिनंदन केले आमचे माजी विद्यार्थी आमचा अभिमान आहे. शाळेचे दरवाजे आपणासाठी सदैव खुले आहेत यानंतर पी डी पाटील यांनी कोरोना काळात आजी- माजी विद्यार्थी व शिक्षकांकडून निधी जमा करत शाळेचे रूप पालटलं यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा माजी विद्यार्थ्यांचा आहे. आमचे माजी विद्यार्थी शाळेला सढळ हाताने मदत करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तदनंतर एस वि आढावे यांनी व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून माजी शिक्षिका सपकाळे मॅडम यांचा विद्यार्थ्यांची संवाद साधून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक वाय एस बडगुजर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व असेच हसत - खेळत एकोप्याने रहा आणि आपल्या शाळेचे नाव मोठे करा असा आशिर्वाद दिला. स्नेह मेळाव्यामध्ये बाहुबली ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते यामध्ये विविध गाण्यांचा श्रोत्यांनी आस्वाद घेतला. यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
पंचवीस वर्षानंतर एकत्र येण्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता सर्वांनी सामूहिक नृत्य देखील केले व आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत हा दिवस अविस्मरणीय आपल्या हृदयात साठवून ठेवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी नरेंद्र बडगुजर तर आभार नितेश माळी यांनी मानले.
हा स्नेह मेळावा यशस्वीतेसाठी १९९९ बॅचचे गुलाब महाजन, सचिन महाजन, प्रकाश चौधरी, रेखा साठे, मनिषा पाटील, कविता बत्तीसे, सपना सोनवणे, मीना भालेराव, अमृत पाटील, कैलास महाजन, किशोर चौधरी, तुषार शिंदे, सुनिल माळी, दीपक वाघ, धर्मा पाटील, नरेंद्र पाटील, संदिप मराठे, विद्या बडगुजर, सपना सोनवणे, दीपक माळी, प्रमोद जगताप, सुजित वाघरे, सुहास वळवी, बाळकृष्ण भोई, उमेश महाजन असे एकूण ७५ विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या बॅचचे सर्व विद्यार्थी सहकुटुंब - सहपरिवार या स्नेह मेळाव्याला उपस्थित होते.
Post a Comment