पारंपारिक प्रथेला तिलाजंली देत सावित्रीमाईच्या लेकीने दिला वडिलांना अग्नीडाग



दशक्रिया व गंधमुक्तीचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने होणार !


धरणगाव : शहरातील लहान माळीवाडा येथील रहिवासी प्रभाकर भिला पाटील यांचे सासरे तसेच समस्त कुणबी पाटील समाज मंडळाचे खजिनदार, सामाजिक कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव प्रभाकर पाटील यांचे आजोबा कै.भगवान दगा पाटील यांचे २०/ ४/ २०२४ रोजी ९२ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले.सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील यांच्या कुटुंबाने अंधश्रद्धा व कर्मकांड दूर सारून पारंपारिक प्रथेला तिलाजंली देत लक्ष्मणराव पाटील यांच्या मातोश्री आशाबाई प्रभाकर पाटील यांनी आपल्या वडिलांच्या चितेला अग्निडाग दिला. 

येत्या २९ व ३० तारखेला आधुनिक भारताचे शिल्पकार, शिक्षणतज्ञ, थोर समाजसेवक, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दशक्रिया व गंधमुक्ती हा विधी तात्यासाहेबांच्या सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने म्हणजेच सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक समाज संघाचे विधीकर्ते शिवदास महाजन ( एरंडोल ) यांच्या हस्ते होणार आहे असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

0/Post a Comment/Comments