महात्मा फुले हायस्कूल शाळेत राष्ट्रसंतास अभिवादन


स्वच्छतेचे महामेरू म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा - विनोद रोकडे


(धरणगांव-प्रतिनिधी)  धरणगांव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.प्रास्ताविक व्ही टी माळी यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून परीट समाजाचे अध्यक्ष तसेच धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद रोकडे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते स्वच्छतेचे महामेरू राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले.

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी देशाला स्वच्छतेचा संदेश दिला शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील गाडगेबाबांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेचा परिसर स्वच्छ करून अनोखी श्रद्धांजली दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार पर्यवेक्षक एम बी मोरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू - भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments