(धरणगांव-प्रतिनिधी) धरणगाव : येथील बी-आर्कटेक कोचींग कलासेस तर्फे वाणी मंगल कार्यालयाच्या सभागृहात छ. शिवजयंती निमित्त शिवमहोत्सव कार्यक्रम आज रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा गुप्ता मॅम यांनी केले. याबाबत अधिक असे, धरणी बाजार येथील बी-आर्कटेक कोचींग कलासेस व समूह वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात म्हणून सर्वदूर परिचित आहेत.
शिवमहोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक कैलास माळी, ॲड.रवींद्र गजरे, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, नेहा गुप्ता मॅम, आदी मान्यवरांनी छ. शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा फुले, राजर्षी शाहुजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थांना कैलास माळी सर, ॲड. रवींद्र गजरे, डॉ. संजीवकुमार सोनवणे सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, छ. शिवाजी महाराज आणि महापुरुषांचे विचारच या देशाला प्रगतीपथावर नेवू शकतात. यासाठी प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी वाचन केले पाहिजे.
तद्नंतर व्याख्याते लक्ष्मण पाटील यांनी शिवरायांचा व्यक्तिमत्त्वाचा लेखाजोखा मांडला. छत्रपतींचे सर्वधर्म समभावाचे कार्य आजही आपल्या सर्वांना नवचैतन्य निर्माण करते. असेही श्री पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते बी-आर्कटेक च्या यशवंत, गुणवंत विद्यार्थी साई महाजन यांना टॅब पारितोषिक भेट देण्यात आले. वैभव गायकवाड यास आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यांसह गुणीजन विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत सोनवणे व जयश्री महाजन यांनी, तर जितेंद्र चखाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासह असंख्य उपस्थिती होती.
Post a Comment