बोरीस यात्रेमध्ये महिलांना दाखविला "सत्यशोधक " चित्रपट

 


वंचित बहुजन आघाडीचा प्रेरणादायी उपक्रम 


(प्रतिनिधी-धळे)  धुळे :  सत्यशोधक - राष्ट्रपिता जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित तसेच त्यांनी जीवनामध्ये बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समता - स्वातंत्रता - न्याय - बंधुता यासाठी अहोरात्र चाललेलं कार्य तसेच त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं अर्थात संपूर्ण स्वातंत्र्याचे जनक जर कोणी असतील तर राष्ट्रपिता जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आहेत अशा जीवनातील त्यांचा चित्रपट जो सत्यशोधक चित्रपट आहे.सत्यशोधक चित्रपट गाव बोरीस तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी सती देवीची यात्रा भरते त्या यात्रेला परिसराचे शंभर गाव येतात यात्रा भरगच्च भरते ८ ते १० दिवस चालते या यात्रेमध्ये गावातील आदिवासी महिला अनुसूचित जमाती महिला तसेच ओबीसी महिलांना सत्यशोधक चित्रपट दाखवण्याचं काम केले या चित्रपटाला महिला आणि पुरुष २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते या सर्वांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पिक्चर दाखवला.


आबासाहेब खैरनार ( उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ), सिताराम वाघ ( जिल्हा उपाध्यक्ष धुळे वंचित बहुजन आघाडी ), दिलीप बोरसे ( जिल्हा सचिव धुळे वंचित बहुजन आघाडी )तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय मालचे, करण देवरे, योगेश शिंदे, इत्यादींनी सत्यशोधक चित्रपट दाखवण्याचं आणि जागृतीचे कार्य केले. हा प्रेरणादायी व सत्याच्या शोध घेणारा सत्यशोधक चित्रपट दाखविल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments