[ द सर्कल न्यूज - प्रतिनिधी ]
धरणगाव : येथील भारतीय जनता पक्षचे जेष्ठ कार्यकर्ते मधुकर सिताराम माळी यांची ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. आघाडीचे जिल्हाध्यक्ष कमलेश तिवारी यांनी नियुक्तीचे पत्र श्री. महाजन यांना दिले.
श्री. महाजन यांची भाजपचे जुने व जेष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर आहे. त्यांचा तालुक्यातील जेष्ठ, युवक व विद्यार्थी वर्गाशी दांडगा संपर्क असून, जेष्ठ कार्यकर्त्याची नियुक्ती झाल्याने सर्व वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊन नवचैतन्य संचारले आहे. महाजन हे पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते असून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे बऱ्यापैकी मजबूत संघटन आहे. मधुकर महाजन यांच्या नियुक्तीबद्दल धरणी बाजार पेठ येथे मित्र परिवाराकडून राजेंद्र वाघ, निलेश पवार, गोपाल पाटील, छोटू कुरेशी, भुषण मराठे, राहुल माळी, रावसाहेब मराठे, योगेश माळी, रविंद्र वाणी, सुनील लोहार, मयूर भामरे आदींनी श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी श्री.महाजन म्हणाले,” पक्षात प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य केल्याने राज्याचे मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या आदेशाने तसेच आघाडीचे जिल्हाध्यक्ष तिवारी यांनी माझी नियुक्ती केली” आगामी २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या धरतीवर जेष्ठ कार्यकर्ता आघाडीचे संघटन मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment