कृष्ण गीता नगर कॉलनी वासियांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार; ना.गुलाबराव पाटील
(धरणगांव प्रतिनिधी) - धरणगांव : नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर गट नंबर ४७५ येथील रहिवाशांनी आज पाळधी येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या निवासस्थानी दरबारात भेट घेतली.सर्वप्रथम कॉलनीवासीयांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले लिखित " गुलामगिरी " व शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बिऱ्हाडे लिखित "डॉ. बाबासाहेब आंबेडकर " यांचे चरित्र हे ग्रंथ व शाल नामदार गुलाबरावजी पाटील यांना भेट देऊन आभार व्यक्त केले. कृष्णा गीता नगरवासी यांच्या कॉलनीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ओपन स्पेस मध्ये तार कंपाऊंड व "१५ x ३० चा ओटा " व मुलांना अभ्यास करण्यासाठी "अभ्यासिका " अशा प्रमुख मागण्या लवकरात लवकर सोडविणार असे प्रतिपादन नामदार गुलाबरावजी पाटील यांनी केले.
याप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक विलास महाजन, कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, कोषाध्यक्ष पी.डी.पाटील, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, भरत पाटील, एस एन कोळी, जे एस पवार, गोकुळ महाजन, अनिल कुलट, निलेश कुलट, संजय सुतार, जगन्नाथ भोई, वासुदेव न्हावी, निलेश गुरव, बन्सी दादा, अजय मैराळे, पंकज मिस्तरी, ज्ञानेश्वर पवार तसेच कृष्ण गीता नगरचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment