ना.गुलाबराव पाटील यांचे कृष्ण गीता नगर कॉलनी वासियांसाठी १० लक्ष देण्याचे आश्वासन
(धरणगांव |प्रतिनिधी) - धरणगांव : नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर गट नंबर ४७५ येथील रहिवाशांनी आज मातोश्री नगर येथील ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांना कॉलनीच्या समस्या संदर्भात निवेदन दिले.सर्वप्रथम कॉलनीवासीयांनी " शिवजयंती चे खरे जनक - राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले " व " सत्यशोधक समाज संघ " हा ग्रंथ नामदार गुलाबरावजी पाटील यांना भेट स्वरूपात दिला. यानंतर निवेदनात कॉलनीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ओपन स्पेस मध्ये तार कंपाऊंड व १५ x ३० चा ओटा व मुलांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका अशा प्रमुख मागण्या केल्यानंतर गुलाबरावजी पाटील यांनी कृष्णा गीता नगर कॉलनीसाठी १० लक्ष देण्याचे आश्वासन दिले व मला लवकरात लवकर इस्टिमेट द्या दोन दिवसात तुमच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.
याप्रसंगी कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी, कोषाध्यक्ष पी.डी.पाटील, प्रल्हाद विसपुते, बाळू अत्तरदे, भरत पाटील, अनिल कुलट, निलेश कुलट, संजय सुतार, जगन्नाथ भोई, वासुदेव न्हावी, निलेश गुरव, एस एन कोळी, जे एस पवार, गोकुळ महाजन, बन्सी दादा, अजय मैराळे, पंकज मिस्तरी तसेच कृष्ण गीता नगरचे रहिवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन ए डी पाटील तर आभार एस के बेलदार यांनी मानले.
Post a Comment