पुरस्काराने ऊर्जा मिळते - निलेश धर्मराज पाटील
(यावल | प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील जि. प. शाळा थोरगव्हाण येथील निलेश धर्मराज पाटील यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव या संघटनेतर्फे 'राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४' देऊन गौरविण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज ११ फेब्रुवारी २०२४ रोजी प. न.लुकंड शाळा जळगांव येथे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव पुरस्कार वितरण सोहळा २०२४ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर समतेच्या आदर्शांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब जगताप यांनी केले. तद्नंतर ३८ जिल्हाभरातील विविध शिक्षक - शिक्षिका यांना 'राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले/ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षक/ शिक्षिका पुरस्कार २०२४' देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जि.प.शाळा थोरगव्हाण येथील निलेश धर्मराज पाटील यांना देखील ' महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक' पुरस्कार प्राप्त झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म.रा.स.प. प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ होते. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे उदघाटक म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्य.शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर, प्राथ.शिक्षणाधिकारी विकास पाटील, डॉ.अनिल झोपे, डॉ. विद्या गायकवाड, शांताराम बडगुजर,अभिजीत बाविस्कर, शालिग्राम भिरूड, संभाजी पाटील, साहित्यीक जयसिंग वाघ, डॉ.चंद्रकांत साळुंखे, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण, डॉ. जगन्नाथ दरंदले , अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील साहेब तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.निलेश पाटील यांना यापूर्वी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, गावस्तरीय असे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्काराने ऊर्जा मिळते असे प्रतिपादन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार वर्षा अहिरराव यांनी केले .
Post a Comment