पाचोरा : संपूर्ण देशाचे लक्ष लागुन असलेल्या १६ आमदार यांच्या अपात्रतेचा अनपेक्षित निकाल समोर आल्याने पाचोरा येथील संतप्त उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडे मारत फलक जाळत तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच राहुल नार्वेकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी,उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, अॅड. अभय पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत, अॅड. दिपक पाटील, युवा उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, युवा सेना शहर प्रमुख हरिष देवरे, भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, अजय पाटील, खंडु सोनवणे, अभिषेक खंडेलवाल, पप्पू जाधव, अतुल चौधरी, मनोज चौधरी यांचेसह उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment