डॉ.आंबेडकरांचा स्वप्नातला भारत घडविण्याचे उपस्थितांना आवाहन; व्याख्याते राजेंद्र खरे



केवळ बाबासाहेबांचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचे तरुणाईस आवाहन; व्याख्याते राजेंद्र खरे


डॉ. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करून मार्गक्रमण करा; व्याख्याते राजेंद्र खरे


डॉ.आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समता मूलक व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन; व्याख्याते राजेंद्र खरे


पिंप्री येथे बाबासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन 


(धरणगांव प्रतिनिधी)  धरणगांव : भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार, समाज सुधारक, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ राजकारणी आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन म्हणून पिंप्री येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात व्याख्याते राजेंद्र खरे यांचा प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिष शिंदे यांनी केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंप्री येथील सरपंच सौ. कमलबाई बच्छाव होत्या. तर प्रमुख अतिथी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, दि.धरणगाव अर्बन बँकेचे संचालक ॲड.गजानन पाटील, डॉ. गोपाल पाटील, भोद येथील सरपंच चंद्रकांत बागुल आदी मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहताना डॉ बाबासाहेबांचे सर्वच क्षेत्रांत असलेल्या कार्याची आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे मनोगतातून आदरांजली वाहिली. तद्नंतर बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक तथा, व्याख्याते राजेंद्र खरे यांनी सांगितले की, ६ डिसेंबर, हा दिवस भारतीय स्मृतीत ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून गणला जातो. भारतीय संविधानाचा पाया रचणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजच्या समाजकारण, राजकारणाचे असे आधारस्तंभ आहेत, की ज्यांना कोणीही नाकारू शकणार नाही. डॉ. आंबेडकर आजही तितकेच समर्पक दिसतात. बाबासाहेबांनी भारतीय समाजातील कुप्रथा, अस्पृश्यता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आहे. इथल्या व्यवस्थेसोबत दोन हात करताना बाबासाहेबांना स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार व पितृसत्ताक संस्कृतीचा असलेला दबावही लक्षात येत होता. ही परिस्थिती बदलण्याचे साधन म्हणजे "शिक्षण"च आहे यावर बाबासाहेबांचा विश्वास होता. बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकताच ज्या स्त्रिया, भगिनी नाकतोंड वाकडे करतात त्यांना बाबासाहेब त्याकाळात कोठे पहात होते व आज तुम्ही भगिनी कोठे आहात याचा विचार सद्सदविवेक बुद्धीने करावा. डॉ बाबासाहेबांचे कार्य व व्यक्तिमत्व महान असुनही दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी "सर्वोच्च भारतीय ग्रंथ संविधान" जाळण्यात येतो. यातून भारतीय समाजात त्यांचा द्वेष का म्हणून वारंवार बघायला मिळतो. म्हणून आपण सर्वांनी केवळ बाबासाहेबांचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांचे अपूर्ण काम, व त्यांना अभिप्रेत असलेली समतामूलक व्यवस्था व समाज निर्माण करुन त्यांचा स्वप्नातला भारत घडविण्याचे उपस्थितांना खासकरून तरूणाईस कळकळीचे आवाहन करुन त्यांचे कार्य व विचार आपल्यासाठी ऊर्जा देणारे आहेत त्यांचे विचार आत्मसात करून समाज प्रबोधन करा असा मोलाचा संदेश आपल्या व्याख्यानातून श्री खरे यांनी दिला. तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाच्या अध्यक्षा कमलबाई बच्छाव यांनी डॉ.बाबासाहेबांनी संबंध भारत देशासाठी जेवढे महान कार्य केले त्यापेक्षाही जास्त महिलांसाठी केलेले आहे. त्यांनी भारतीय संविधानात स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्वावलंबी जीवनासाठी नोकरी करण्याचा अधिकार दिला. देशातील महिला आजही "चूल आणि मूल" सांभाळत बसल्या असत्या. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळून दिले त्यांच्या हक्क व अधिकारासाठी हिंदू कोड बिल संसदेत मांडले परंतु हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून मंत्री पदाच्या देखील राजीनामा दिला. त्याचप्रमाणे स्त्रियांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून भारतात प्रथम परिवार नियोजनाचा नारा देणारे ते प्रथम महामानव ठरलेत. असे बाबासाहेब यांचे अनमोल विचार व कार्य सरपंच सौ. बच्छाव यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. याप्रसंगी ग्रा.पं.सदस्या सरला लोखंडे, चावलखेडा उपसरपंच समाधान पाटील, प्रशांत तायडे पो. पाटील, गोपाल बडगुजर, भारत मुक्ती मोर्चा प्रदेश सचिव मोहन शिंदे, धरणगाव येथील आदिवासी परिषदेचे नेते गंगाराम साळुंके, जितेंद्र चव्हाण, पत्रकार संघाचे राजेंद्र वाघ, ताराचंद सोनवणे, विकास पारधी, विलास तायडे, सुशील तायडे, गौतम दोडे, विजय कडरे, विजय साळवे, अविनाश नन्नवरे, पंकज भालेराव राजू साळवे, निलेश तायडे, रोहित तायडे, बिट्टू तायडे, गौतम तायडे, राहुल तायडे, शेखर भालेराव, सुनील बिऱ्हाडे, सुनील तामसवरे, नवल सपकाळे, सुधाकर पाटील, सोमा नाईक, संजय पवार, आधार नाईक, निलेश बीजबीरे, राज अहिरे, गणेश अहिरे, शुभम नरवाडे, कृष्णा मोरे, शुभम सोनवणे, रमेश दोडे, विकी अधांगे, दिनेश तायडे, प्रकाश लोखंडे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणगाव पोलीस प्रशासनाकडून हवालदार मोती पवार, राजेंद्र कोळी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बोरसे तर आभार समाधान पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचशील गृप चावलखेडा आणि सम्राट गृप सदस्यांनी सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments