डॉ.बाबासाहेबांचे विचार आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत - शिवानी वाघ.
फुले - शाहू - आंबेडकर हेच आपले आदर्श - मुख्याध्यापक जे.एस.पवार
(धरणगाव |प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वानदिनी अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग बार्टी संस्थेचे समतादुत शिवानी सुनील वाघ उपस्थित होते. शाळेच्या वतीने वाघ मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. यानंतर वाघ यांनी बाबासाहेबांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला व माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे असे सुंदर गीत सादर केले.
शाळेचे उपशिक्षक व्ही.टी.माळी यांनी सुंदर भीमगीत सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी बाबासाहेबांच्या संविधानावर भारत देश अखंड मार्गक्रमण करत आहे. बाबासाहेबांचे विचार आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. फुले - शाहू - आंबेडकर हेच आपले मार्गदर्शक आहेत त्यांच्या विचारांचे अनुकरण सर्व विद्यार्थ्यांनी केले पाहिजे असे प्रतिपादन पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.
Post a Comment