(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : के जी गुजराथी निवासी मूकबधिर विद्यालय धरणगाव येथे 'जागतिक दिव्यांग दिन' दिव्यांग बांधवांसमवेत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धरणगाव तहसिलचे तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी होते. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी गावातून दिव्यांग बांधवांसमवेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घेण्यात आले. तद्नंतर तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी, पत्रकार धर्मराज मोरे, विनोद रोकडे, हेडगेवार ग्रा.पं.उपसरपंच चंदन पाटील, ॲड.संदीप पाटील, मुख्याध्यापक वाल्मीक पाटील आदी मान्यवरांनी डॉ. हेलन केलर यांच्या स्मृतींना अभिवादन करत प्रतिमेस माल्यार्पण केले. कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक वाल्मीक पाटील यांनी दिव्यांग दिनाबाबत आपल्या मनोगतात सांगितले की, आजचा ३ डिसेंबर दिवस हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून दरवर्षी ३ डिसेंबर १९९२ पासून जगभरात साजरा केला जातो. अपंग, दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणे आणि इतर लोकांना त्याची जाणीव करून देणे हा त्याचा उद्देश आहे. समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण साधलं जावं, या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो असे मुख्याध्यापक पाटील यांनी माहिती दिली, तद्नंतर तहसिलदार सूर्यवंशी यांनी आजचा दिनी सामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. या दिवशी दिव्यांग व्यक्तिच्या सामाजिक राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी शासन विविध स्तरावर उपक्रम राबवते. भारत सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण कायदा २७ डिसेंबर २०१६ रोजी लागू केला. या कायद्यांतर्गत शारीरिक (अस्तिव्यंग, कुष्ठरोग, मेंदूचा पक्षाघात, बुटकेपणा, अविकसीत मांसपेशी, अॅसिड हल्ला, अंध, कर्णंबधीर आणि भाषा अक्षमता, बौधिक अक्षमता, अध्ययन अक्षमता, मानसिक आजार, सीकल सेल कँसर, मज्जासंस्थेचे आजार, बहुविकलांग) दिव्यांग असलेल्या व्यक्तीच्या हक्काविषयींच्या तरतुदींचा तपशील आहे. यानिमित्ताने दिव्यांगाच्या उत्थानासाठी नाविन्यपूर्ण कल्पना व तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वसमावेशक प्रगतीशील समाज निर्माण करणं हे तुमचं आमचं सर्वांचं कार्य आहे म्हणून आपण सर्वांनी दिव्यांगांसाठी सर्वोतपरी सहकार्य करणे अपेक्षित आहे. असे तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी उपस्थित दिव्यांग बांधव, मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत आपले अनमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भडांगे यांनी तर आभार आर एच पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन एस पाटील, किशोर पाटील, सी एस पाटील, उमेश पाटील आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post a Comment