शेतकरी संकटात असताना राज्याचा सुलतान आणि उपसुलतान निवडणुकांच्या प्रचारात मग्न आहे ; संजय सावंत

 



काळे शर्ट व कापसाचे बोडे लावलेल्या पोशाख परिधान करून गुलाबराव वाघनी केला शासनाच्या निषेध


(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे देशातील काही राज्यामध्ये निवडणुकांचं सत्र सुरू आहे.अशात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झालेले दिसून आले आहे. यावरून संजय सावंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.धरणगाव येथील बैलगाडी मोर्चात ते बोलत होते.संजय सावंत  म्हणाले, “अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या बाबतीत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसापासून राज्यातील शेतकरी बांधावर बसून रडत आहे.नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यात आत्महत्याचे विचार येत आहे जळगाव धरणगाव एरंडोल पारोळा पाचोरा भडगाव  भागांमध्ये शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे. शेतकरी संकटात असताना सरकार कुठे आहे? सरकार जागेवर आहे का? सरकार पसार झालं आहे.” मा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आलो आहे असे सावंत म्हणाले यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी बैलगाडी मोर्चा संबोधित करत असताना शेतकरी राब राब राबतो परंतु त्याचा मेहनतीला फळ मिळत नाही यांत चा दुष्काळात तेरावा महिना हे सरकार सत्तेत आहे शेतकरी चा मालाला हमी भाव नाही पीक विमा चे पैसे मिळत नाही अतिवृष्टी चे अनुदान नाही फक्त घोषणा करून शेतकरी ची थट्टा करत आहेत शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून वाव वाव करणारे पालकमंत्री गप्प का ? कुठे गेला तुमचा शिंगाडा ....? तीन मंत्री असून शेतकरी वाऱ्यावर सोडले ज्या दिवशी माझ्या शेतकरी राजा रस्त्यावर उतरले तेव्हा नाकीनऊ येईल असे श्री वाघ यांनी संबोधित केले.  बैल गाडी मोर्चात शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ  यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. 'एकीकडे महाराष्ट्राचे पाणी पद्धतशीरपणे गुजरातकडे वळवण्याचा घाट घातला जात आहे व दुसरीकडे बुलेट ट्रेनचा बुलडोझर शेतकऱ्यांच्या जमिनीवर फिरू लागला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या व गरजा फार नाहीत. त्यांना फक्त सुखाने जगण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. नोटाबंदीच्या गळफासात त्याची मान आजही अडकलेली आहे. त्याचे अर्थकारण उद्ध्वस्त झाले आहे. महागाई वाढली आहे. डिझेल, पेट्रोलचे भाव रोज वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी व कामगारांच्या जीवनाची राखरांगोळी होत चालली आहे.तसेचधरणगाव शहरात 15 दिवस पाणी पुरवठा होत नाही अधिकारी मात्र प्रभारी म्हणून काम करत आहेत  नगरपालिका मध्ये करोडो चा भ्रष्टाचार सुरू आहे काळे शर्ट व कापचाचे बोडे लावून सरकारचा निषेध व्यक्त करत आहे असेही सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींचे काय झाले? शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याच्या घोषणेचे काय झाले?  असे एक ना अनेक प्रश्न मा लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनी मांडले तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करा ही पहिली मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने . त्यासाठी  रान पेटवले व सरकार गदागदा हलवले तेव्हा सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली, पण ही कर्जमुक्ती फसवी होती . हजारो, लाखो शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभापासून आजही वंचित आहेत. कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नाही व राजकीय लाभासाठी फक्त जाहिरातबाजी झाली. सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकार फक्त तोंडाला पाने पुसत आहे अशी घणाघात टीका निलेश चौधरी यांनी केले.तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भागळे यांनी आपल्या मनोगतात शेतकरी हा मैदानात उतरला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम हे सरकारी पक्षाचे आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र अदोलन करू असे ते म्हणाले शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील यांनी शेतकरी चा अतिवृष्टी अनुदान पीक विमा विषयी सविस्तर माहिती दिली यावेळी शेतकऱ्यांना  ही तीव्र प्रतिक्रिया दिल्या  

शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी , युवा सेना जिल्हा प्रमुख व मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी  उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी संघटक राजेंद्र ठाकरे , तालुका प्रमुख जयदीप पाटील शेतकरी संघटना ता प्रमुख विजय पाटील शहर प्रमुख भागवत चौधरी माजी जि प उपाध्यक्ष जानकीराम पाटील, मा सभापती दिपक सोनवणे सह हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते  यावेळी तहसीलदार सूर्यवंशी यांना मागण्या चे निवेदन मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले सूत्रसंचालन संतोष सोनवणे तर आभार विनोद रोकडे यांनी मानले

0/Post a Comment/Comments