(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : येथील ग्रामीण रुग्णालय व पी आर हायस्कूल धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढून समाजात प्रबोधनपर प्रचार प्रसार करण्यात आला. रॅलीला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.स्वप्नील दुसरे, डॉ. स्वप्निल कळसकर एनसीसी अधिकारी डी एस पाटील यांनी हिरवी झेडी दाखवली. रॅली ची सुरुवात ग्रामीण रुग्णालय येथून छ.शिवाजी महाराज स्मारक, सुभाष दरवाजा, परिहार चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, अर्बन बँक, बस स्थानक मार्गे पी आर हायस्कूल येथे समारोप करण्यात आला. 'आता नेतृत्व समुदायाचे' या प्रमुख ध्येय ला अनुसरून ग्रामीण रुग्णालय धरणगाव व पी. आर. हायस्कूल एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही जनजागृती पर रॅली, प्रतिज्ञा व पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी, शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आयसीटीसी समुपदेशक डी जी शिंपी यांनी प्रास्ताविकातून एड्स दिनानिमित्त आयोजित सप्ताहच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
वैद्यकिय अधिक्षक डॉ.मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकिय अधिकारी, डॉ.स्वप्नील दुसरे, डॉ. मयुर जैन, डॉ. स्वप्निल कळसकर, डॉ. मोहसिन शाह, डॉ छाया तांदळे, पी आर हायस्कूल मुख्याध्यापक संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक डॉ. आशा शिरसाट, एन सी सी अधिकारी डी एस पाटील, वाय ए पाटील, आयसीटीसी समुपदेशक डी जी शिंपी, समुपदेशक गणेश कुंभार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आर ए काकडे, क्षयरोग परिवेक्षक नंदू चौधरी, फार्मसी दिनेश बडगुजर, विजय कंखरे, परिसेविका एन वी दोर्कर, श्वेता सुर्यवंशी, भाऊसाहेब रोहित खंडारे, संजय वाणी, प्रदीप येवले, दिनेश पाटील, कुणाल चौधरी, नामदेव मराठे, महेंद्र सपकाळे आदी उपस्थित होते. रॅली दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना चीफ ऑफिसर डी एस पाटील यांनी एड्स जनजागृतीपर प्रबोधन करीत शपथ दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर ए काकडे यांनी तर डी एस पाटील यांनी आभार मानले.
Post a Comment