धरणगाव शहरात तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी अभिवादन रॅली


(धरणगाव|प्रतिनिधी) धरणगांव : भारतातील थोर समाज सुधारक - ज्ञानसूर्य - शिक्षणतज्ञ - राष्ट्रपिता - सत्यशोधक - महात्मा ज्योतिराव फुले यांची धरणगाव शहरात स्मृतिदिनी अभिवादन रॅली काढण्यात आली.अभिवादन रॅलीची सुरुवात लहान माळीवाडा परिसरातील माळी समाज व पाटील समाज मढी येथून करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने शेतकऱ्याच्या बैलगाडीवर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित माळी, पाटील व बहुजन  समाजाच्या मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आले.लहान माळीवाडा परिसरातून रॅलीची सुरुवात झाली. गबानंद चौक, कोट बाजार मार्गे धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला उपस्थित शैक्षणिक - सामाजिक - राजकीय - पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यानंतर रॅली पुढे मोठा माळीवाडा या मार्गाने जात सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ मोठा माळी वाडा माळी समाज मढी येथे अभिवादन रॅलीचा समारोप करण्यात आला.



याप्रसंगी मोठा माळीवाडा समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, कडू महाजन, कोषाध्यक्ष व्ही टी माळी, दिपक महाजन, सचिव गोपाल माळी, राजेंद्र महाजन तसेच पाटील समाजाचे अध्यक्ष भीमराज पाटील व संपूर्ण पंचमंडळ व राजकीय क्षेत्रातील शिवसेनेचे गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, भाजपचे संजय महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे नेते भानुदास विसावे, नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन, दशरथ महाजन, सुखदेव महाजन, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, जेष्ठ पत्रकार धर्मराज मोरे, रवि महाजन, माळी समाजाचे पंच रावा महाजन, सुकदेव माळी, विजय महाजन, कैलास माळी, आर.डी. महाजन, एच डी माळी, पी.डी.पाटील, नितेश महाजन, राजेंद्र महाजन, गोरख देशमुख, तसेच सर्व समाजातील जेष्ठ मान्यवर, पत्रकार, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, पत्रकारीता क्षेत्रातील सर्व मान्यवर तथा युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments