राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत सचिन सूर्यवंशी यांना सिल्वर पदक


(धरणगाव|प्रतिनिधी) धरणगाव :  येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सचिन लोटन सूर्यवंशी यांनी अमरावती येथे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय खेलोमास्टर्स गेम्स स्पर्धेत ५ किलोमीटर चालणे (५० +men) ॲथलेटिक्स स्पर्धेत सिल्वर पदकाची कमाई केली असून त्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती महाराष्ट्र खेलोमास्टर्स गेम्स असोसिएशन व अमरावती जिल्हा खेलोमास्टर्स गेम्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने दि.२४ ते २६ नोव्हे, दरम्यान आयोजित द्वितीय महाराष्ट्र राज्य खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत धरणगावचे क्रीडाशिक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सहभाग नोंदवून यश संपादन केले. स्पर्धेचे उद्घाटन खा. नवनीत राणा यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, आमदार बळवंत वानखेडे, माजी महापौर विलास इंगोले यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्या अंजली ठाकरे यांनी तर सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ नितीन चव्हाळे यांनी केले. क्रीडाशिक्षक सूर्यवंशी यांच्या अतुलनीय यशाबद्दल धरणगाव व परीसरात अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

0/Post a Comment/Comments