गुड शेपर्ड स्कुलमध्ये संविधान दिन साजरा




(धरणगाव |प्रतिनिधी)  धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला तसेच याप्रसंगी २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुड शेपर्ड स्कुल मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी विश्वरत्न डॉक्टर.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले तसेच शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. तद्नंतर २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या हुतात्म्यांना व प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकात उपशिक्षक लक्ष्मण पाटील यांनी संविधान हाच सर्व भारतीयांच्या जगण्याचा आधार असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे शिक्षिका भारती तिवारी, स्वाती भावे, शिरीन खाटीक, सुनिता भालेराव, लक्ष्मण पाटील यांच्यासह शितल सोनवणे, वैशाली पाटील, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments