धरणगावात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत इंदिरा गांधी जयंती उत्साहात साजरी


(धरणगाव|प्रतिनिधी) धरणगाव : येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री तथा भारतरत्न इंदिरा गांधी जयंतीनिमित्त दिवंगत इंदिराजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून जेष्ठ समाजसेवक गो.भि. सोनवणे यांनी "राष्ट्रीय एकात्मता दिवस" म्हणून उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली.कार्यक्रमाच्या तत्पूर्वी कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छ. शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश येवले यांनी केले. तद्नंतर दिवंगत इंदिराजींच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करून अभिवादन करण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, पत्रकार राजेंद्र वाघ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ चौधरी आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात दिवंगत इंदिराजींनी प्रथम महिला प्रधानमंत्री म्हणून स्वतःचा कधी गौरव करून घेतलेला आजपावेतोच्या इतिहासात अथवा वाचनात आढळत नाही. आपल्या कार्यकाळात कणखर आणि रोखठोक भूमिका घेणाऱ्या म्हणून विश्वभरात प्रसिद्ध असलेल्या "आयरन लेडी इंदिरा" गांधींबद्दल सांगण्यासारखं खूप आहे. परंतु शब्दांना मर्यादा असतात म्हणून त्यांची व्यक्तिरेखा मांडणे कठीण आहे. अश्या शब्दात इंदिराजींच्या कार्याचे मूल्यमापन करीत आजच्या दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मनोगत व्यक्त केले.प्रतिमा पूजनप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, जितेंद्र धनगर, पाटील समाजाध्यक्ष भीमराज पाटील, गोपाल पाटील, जेष्ठ पत्रकार धर्मराज मोरे, पी.डी.पाटील, निलेश पवार, सुधाकर मोरे, राजू बाविस्कर, काँग्रेसचे विजय जनकवार, नंदलाल महाजन, गणेश सोनवणे, दिनेश पाटील, रऊफ पठाण, गौरव चौहान, राहुल रोकडे, दिनेश भदाणे, विक्रम पाटील, सुनिल सोनवणे, संगम सोनवणे, चंपालाल भदाणे, आनंद पाटील, गौतम गजरे, भुवन भामरे आदींसह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र माळी यांनी तर आभार रावसाहेब पाटील यांनी मानले.

0/Post a Comment/Comments