(धरणगाव : प्रतिनिधी) धरणगाव : शहरातील शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार तसेच गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचे उपक्रमशील शिक्षक लक्ष्मणराव पाटील तसेच सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांना नुकतेच धुळे येथे भारत सरकारच्या गैर शासकीय नामांकन असलेल्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्यातर्फे "राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले होते. आपल्या गावासाठी व तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे दोन्ही आदर्श शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख व मा.लो. नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहर प्रमुख भागवत चौधरी, मा. नगरसेवक जितेंद्र धनगर, तालुका समन्वयक संतोष सोनवणे, प्रभाकर पाटील, गोपाल महाजन, राजेश मकवाने, विजय पाटील, गोपाल पाटील, प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन, तसेच उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment