शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धरणगाव प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढ



प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ७ ऑक्टोबर पर्यंत प्रवेश अर्जाची संधी



(धरणगाव : प्रतिनिधी)  धरणगांव : धरणगाव शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) धरणगाव संस्थेत विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकणाऱ्या उमेदवारांना ४ थ्या फेरी मध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी उमेदवारांनी ५ ऑक्टो ते ७ ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरावे.नवीन विद्यार्थ्यांना शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)  धरणगाव संस्थेत खालील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. सदरील प्रवेश जागा खालील प्रमाण

COPA -10 जागा, POCM- 04 जागा , Dress making- 6 जागा, Cosmotology - 11 जागा उपलब्ध आहेत. शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी आहे, त्यांनी त्वरित प्रवेश अर्ज दाखल करण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धरणगाव चे प्राचार्य एम ए मराठे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments