गुड शेपर्ड स्कुलमध्ये लक्ष्मणराव पाटलांचा सत्कार

 



(धरणगाव प्रतिनिधी)  धरणगाव : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल लक्ष्मणराव पाटील यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, नुकताच धुळे येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात लक्ष्मणराव पाटील यांना भारत सरकारच्या गैर शासकीय नामांकन असलेल्या नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम यांच्यातर्फे "राज्यस्तरीय डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेतील शिक्षकाला हा बहुमान मिळाला म्हणून आज गुड शेपर्ड स्कुलमध्ये शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते तसेच प्राचार्य चैताली रावतोळे व मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मणराव पाटलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  शाळेतील जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, पूनम कासार, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे हे शिक्षकवर्ग तसेच शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी देखील लक्ष्मणराव पाटील यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिरीन खाटीक यांनी केले.

0/Post a Comment/Comments