(धरणगाव : प्रतिनिधी) धरणगाव : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त कलाम सरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.सर्वप्रथम मिसाईल मॅन डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला प्राचार्या चैताली रावतोळे, मुख्याध्यापिका नाजनिन शेख व व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिक्षिका नाजुका भदाणे यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील निवडक प्रसंग सांगून त्यांच्या कार्याची महती वर्णन केली. कलामांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर कलामांच्या जीवनातील आदर्श घेऊन आपण मार्गक्रमण केले पाहिजे, असे प्रतिपादन भदाणे यांनी केले.कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, गायत्री सोनवणे, सपना पाटील, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील हे शिक्षकवर्ग तसेच शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नाजुका भदाणे यांनी केले.
Post a Comment