धरणगाव ग्रामीण रुग्णालयात “जागतिक मानसिक आरोग्य दिनी” शिबिर संपन्न


(धरणगाव : प्रतिनिधी)  धरणगाव : येथील धरणगाव ग्रामीण रुग्णालयात जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने "मानसिक आरोग्य शिबिर" व जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मानसतज्ञ चिकित्सक दौलत निमसे यांनी टेलीमानस टोल फ्री क्रमांक, मानसिक ताण-तणाव, नैराश्य, उदासीनता आल्यास निसंकोच १४४१६ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा याबाबतीत आवाहन केले. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांनी उपस्थितांना मानसिक आजार बाबतीत समस्या सांगितल्या. त्याचसोबत मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे. या घोषवाक्यासह माहिती देत उपचाराचे महत्त्व पटवून दिले. तद्नंतर मानसोपचार तज्ज्ञ डॉ कांचन नारखेडे यांनी मानसिक आजार झाल्यास योग्यवेळी उपचार व समुपदेशन घेतल्यास बरा होऊ शकतो. कोणतेही अघोरी उपाय न करता मानसोपचाराचा सल्ला, समुपदेशन घेणे गरजेचे आहे. या शिबिर कार्यक्रमात २३८ रुग्णांची स्क्रिनिंग करुन ९७ मानसिक रुग्णांची आरोग्य तपासणी, उपचार व समुपदेशन करण्यात आले.यावेळी आरोग्य अधिकारी डॉ संजय चव्हाण, कार्यक्रमाधिकारी डॉ. कांचन नारखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आकाश चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका पाटील,  मानसतज्ञ दौलत निमसे, आरोग्यदूत मुकुंद गोसावी, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद लोणारी, ग्रामीण रुग्णालयाचे ज्ञानेश्वर शिंपी, अविनाश चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील, यांसह उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील, शहरप्रमुख विलास महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिर यशस्वीतेसाठी मनोपरिचारक विनोद गडकर, राखी भगत, मिलिंद बराटे, चंद्रकांत ठाकूर, आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन मिलिंद लोणारी यांनी तर आभार मुकुंद गोसावी यांनी मानले.

0/Post a Comment/Comments