धरणगाव : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सोबत संभाषण असलेली रमेश पाटील यांची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने धरणगाव शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणा बाजी करत आंदोलन करण्यात आले.रमेश पाटील यांचे अर्धनग्न प्रतीकात्मक फोटो हातात घेऊन निषेध करण्यात आला.मराठा आरक्षणाबाबत रमेश पाटील नामक व्यक्तीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना संपर्क करून तुम्ही मराठा आहात तर मंत्री पदाचा राजीनामा द्या अशी शब्दीक चकमक चालू असताना अश्लील शिवीगाळ करून लोकप्रतिनिधीची बदनामी केली आहे.यासंदर्भात अधिक असे की सोशल मीडियावर रमेश पाटील रा.छत्रपती संभाजीनगर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत फोनवर राजीनामा द्या अशी मागणी करत शिवीगाळ करून संभाषण असलेली क्लिप व्हायरल केली.तसेच धरणगाव येथील नगरसेवक व इतर एका व्यक्तीने धरणगाव तालुका परिसरातील व्हॉट्स ॲप ग्रुप मध्ये क्लिप व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला असून धरणगाव पोलिस स्थानकात बदनामी करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धरणगाव पोलिस निरीक्षक यांचा कडे केली आहे.यावेळी शिंदे गटाचे शहर प्रमुख विलास महाजन,वासुदेव चौधरी, धिरेंद्र पुरभे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment