सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नाशिक येथे उत्साहात संपन्न
(धरणगांव प्रतिनिधी) धरणगांव : सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सत्यशोधक नगरी,जय शंकर लॉन्स,औरंगाबाद रोड,जेजुरकर मळा, नाशिक येथे संपन्न झाले. या ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन सत्यशोधक राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते सत्यशोधक समाज संघाच्या झेंड्याचे ध्वजारोहण व मशाल पेटवून उद्घाटन झाले.प्रमुख उपस्थिती मान्यवर म्हणुन महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ,सत्यशोधक गणपत दादा मोरे यांचे नातू विश्वासराव मोरे ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र व साधने समितीचे माजी सचिव डॉ.राजेंद्र कुंभार ( कोल्हापुर ),प्रमिती हरी नरके , ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, सत्यशोधक चळवळीचे संशोधक तथा विचारवंत लेखक जी.ए.उगले ( पैठण ) उपस्थित होते. या ऐतिहासिक अधिवेशनाचे सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार सत्यशोधक समाजाची भूमिका मांडली. सर्व विचार मंचावरील सत्यशोधक मान्यवरांनी सत्यशोधक चळवळीचे महत्त्व व आजच्या या समाजाला सत्यशोधक समाजाची नित्तांत गरज आहे म्हणून सर्वांनी शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे गरजेचे आहे असे एकमुखाने या अधिवेशनात म्हटले. या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार धरणगावकर झाले धरणगाव येथील मोठा माळीवाडा व लहान माळीवाडा माळी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ यांनी या आधी ऐतिहासिक अधिवेशनातील विचारमंथनाचा लाभ घेतला. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजी देशमुख, निंबाजी महाजन, कोषाध्यक्ष व्ही टी माळी, सहसचिव दीपक महाजन, ज्येष्ठ पंच सुखदेव महाजन, रावा महाजन, माजी सचिव दशरथ महाजन, एस.डब्ल्यु.पाटील, व्ही.पी. महाले, एकनाथ महाजन, रामदास महाजन, राजेंद्र महाजन, सल्लागार पंच एच.डी.माळी, नितेश महाजन, सामाजिक कार्यकर्ते तथा शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील, दिनेश पाटील, विक्रम पाटील, पी.डी.पाटील. तसेच बहुजन समाजातील धरणगाव शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment