धरणगावात 'रन फॉर स्किल' मॅरेथॉन स्पर्धा व 'दीक्षांत समारंभ' उत्साहात संपन्न


(धरणगाव प्रतिनिधी)  धरणगाव : येथील शासकिय औद्योगिक (आयटीआय) संस्थेच्या वतीने आयोजित पीएम 'रन फॉर स्किल' मॅरेथॉन स्पर्धा व दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न झाला. मॅरेथॉन स्पर्धेत एकूण १२६ महिला - पुरूष धावपटूंनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य नवनीत चव्हाण यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन धरणगाव पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक संतोष पवार, माहिती अधिकार कायदा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, उपप्राचार्य एम ए मराठे, सुधाकर मोरे, पो.ना.वैभव बाविस्कर यांनी झेंडा दाखवत उद्घाटन केले. रॅलीचा मार्ग शासकीय आय.टी.आय पासुन ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत, तेथून परत आयटीआय पर्यंत अशी पार पडली.शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै-२०२३ च्या पूर्ण संस्थेतून प्रत्येक अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 'दीक्षांत समारंभ' कार्यक्रमात अंतिम प्रमाणपत्र व विशेष करंडक देवून गुणगौरव करण्यात आले. पुरुष आणि महिला गटामध्ये प्रथम, द्वितीय, व तृतीय असे तीन क्रमांक काढण्यात आले. पीएम "मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय (पुरुष व महिला) विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रुपये ३ हजार, २ हजार  व १ हजाराचा धनादेश व प्रमाणपत्र अप्पर तहसिलदार ज्ञानेश्वर काकडे, आरटीआय महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र वाघ, संस्थेचे प्राचार्य नवनीत चव्हाण सो, प्रभारी एम ए मराठे सो, यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अप्पर तहसिलदार ज्ञानेश्वर काकडे, पोलिस निरीक्षक संतोष पवार, माहिती अधिकार कायदा महासंघाचे राजेंद्र वाघ, प्राचार्य नवनीत चव्हाण, प्र.प्रा.एम ए मराठे, आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ शिक्षक दिलीप वाघ, दिपक परदेशी, दिपक नेरकर संतोष मेढे, शुभांगी पाटील मॅम, नंदा कापडे मॅम, शिपाई मोरे, चावरे, मेस्को कर्मचारी सतीश पाटील, विठ्ठल पाटील, बागुल दादा, ज्ञानेश्वर मराठे आदी कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप वाघ व दिपक नेरकर यांनी तर आभार उपप्राचार्य एम ए मराठे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments