मुंबई : मराठवाड्यातील मराठ्यांना विदर्भाच्या धर्तीवर कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सुरु असताना व राज्य सरकारने त्यासंदर्भात एक समिती नेमली असताना ओबीसी संघटनांकडून त्याला विरोध सुरु झाला आहे.ओबीसी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून मराठ्यांना ओबीसीतून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही,असा इशारा ओबीसी संघटनांनी दिला आहे.जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरु केल्याने पेच निर्माण झाला असून आज उपोषणाचा नववा दिवस आहे. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात चाचपणीसाठी राज्य सरकारने समिती नेमली आहे. महिनाभरात समितीला अहवाल द्यायचा आहे. अशात आत ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध कुणबी असे या वादाला स्वरुप येऊ लागले आहे.
Post a Comment