(धरणगाव प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील संत सावता माळी समाज सुधारणा मंडळ मोठा माळीवाडा धरणगाव समस्त माळी समाजाच्या वतीने समाजातील आदर्श शिक्षक, आदर्श शेतकरी, व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डी महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समस्त माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, भाजपाचे गटनेते कैलास माळी, माळी समाजाचे उपाध्यक्ष निंबाजी महाजन, पंचमंडळाचे विश्वस्त विजय महाजन, विठोबा माऊली, कांतीलाल माळी, सल्लागार पंच पी डी पाटील उपस्थित होते. सत्कारमूर्ती महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी तथा माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी.माळी , आदर्श शेतकरी पुरस्कारार्थी भगवान महाजन, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांची कन्या कु.सृष्टी महाजन हिचा बी.डी.एस.ला प्रवेश मिळाल्याबद्दल, कै. प्रवीण महाजन यांची सुकन्या भारती माळी ही पोस्टात रुजू झाल्याबद्दल समस्त माळी समाजाच्या वतीने वरील मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्कारमूर्ती व्ही.टी.माळी, सृष्टी महाजन व भारती माळी यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन यांनी सत्कारमूर्तींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माळी समाजाचे सचिव गोपाल माळी, कैलास माळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर डी महाजन तर आभार सचिव गोपाल माळी यांनी मानले.
Post a Comment