(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करून करण्यात आली. ज्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो असे भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी पुष्पहार अर्पण केला. शिक्षणाची गंगा बहुजनांच्या घरापर्यंत पोहचविणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेला शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी तर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला शिक्षिका नाजनिन शेख यांनी माल्यार्पण केले. शिक्षक दिन का साजरा केला जातो? शिक्षक दिनाचे महत्व याविषयी सुरवातीला प्रास्ताविकातून माहिती देण्यात आली. आजच्या दिवशी ज्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली त्यांचा व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प सत्कार करण्यात आला. हेड बॉय कुणाल चव्हाण, हेड गर्ल अंजली बडगुजर यांच्यासह ब्लू, एलो, ग्रीन, रेड हाऊसचे कॅप्टन यांना बॅच देऊन गौरविण्यात आले तसेच त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वांना शपथ देण्यात आली. इयत्ता ७ आणि १० वीच्या विद्यार्थिनींनी गुरूंचे ऋण व्यक्त करणारे गीत सादर केले. इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या बद्दल आदरभाव, गुरुची शिकवण आणि महत्व याबद्दल कविता, गीते व मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या चैताली रावतोळे, व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, सुनिता भालेराव, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील हे शिक्षकवर्ग तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी शिक्षक तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रीष्मा पाटील यांनी केले.
Post a Comment