सत्यशोधक समाज संघाचे नामदार भुजबळ साहेबांनी स्वीकारले आमंत्रण
(धरणगांव प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.नामदार छगन भुजबळ साहेब [ संस्थापक अध्यक्ष :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ] यांची भेट घेऊन त्यांना सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक प्रा.हरी नरके सरांच्या स्मृती निमित्त संपन्न होत असलेल्या सत्यशोधक समाजाच्या नाशिक येथे दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न होणाऱ्या राज्य अधिवेशनाचे आमंत्रण छत्रपती संभाजीनगर येथे दिले. भुजबळ साहेबांनी हे आमंत्रण स्विकारले व वर्तमान सामाजिक परिस्थितीवर सखोल अशी चर्चा झाली जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते या अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी मदत करतील असे आश्वासन भुजबळ साहेबांनी दिले.या भेटीप्रसंगी साहेबांना प्रबोधनकार ठाकरे लिखित ' कर्मयोगी गाडगेबाबा ' हा अनमोल ग्रंथ भेट दिला. यावेळी सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ घोडके, सेवानिवृत्त प्रांताधिकारी भाऊसाहेब जाधव, सत्यधर्मिय विधीकर्ते साळूबा पांडव, गणेश काळे हे उपस्थित होते.
Post a Comment