मनोहर भिडेच्या अटकेसह विविध मागण्यासाठी पुण्यात महामोर्चा

 



पुणे येथे  भारत मुक्ती मोर्चा कडून रविवार दि.१० सप्टेंबर रोजी विविध मागण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.महामोर्चाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे 1.बहुजन महापुरुषांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या मनोहर भिडेला अटक करावी.2.बहुजन समाजातील आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत.3.बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या दत्तवाडी (पर्वती पोलीस स्टेशन) चे PSI चंद्रकात कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करावा.4 पुण्यातील बालगंधर्व मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ब. मो. पुरंदरेचा पुतळा लावून छत्रपती शिवाजी महारांचा अवमान करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करण्यात यावी.5.महाराष्ट्रारामध्ये होत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, धार्मिक अल्पसंख्याक व महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडवून आणनात्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.6जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी संविधानिक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अमानवीय लाठी हल्ल्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुर्णपणे जबाबदार आहेत. त्यांनी त्वरीत राजीनामा द्यावा.अश्या विविध मागण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा कडून १० सप्टेंबर रविवार रोजी दुफारी ३ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.या महामोर्चात लाखोच्या संख्येने उस्थित राहण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य  कार्यनिष्पादन समितीकडून करण्यात आले आहे

0/Post a Comment/Comments