महात्मा फुले हायस्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा


वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनी शाळेला दिले " घड्याळ " भेट 


(धरणगाव प्रतिनिधी) धरणगांव : शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळा चालविण्याचा अनुभव घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.दामिनी भोई हीने केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी मुख्याध्यापिका कु.अर्चना भोई होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व पर्यवेक्षक एम बी मोरे होते. मान्यवरांच्या हस्ते शिक्षणतज्ञ सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर वर्ग दहावीच्या सर्व शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी विद्यार्थी मुख्याध्यापिका कु.अर्चना भोई हिला 'ओळख महामातांची ' हा अनमोल ग्रंथ भेट दिला. याप्रसंगी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला अजिंठा कंपनीचे घड्याळ मुख्याध्यापक जे एस पवार यांना भेट दिले.कु. कोमल भोई ने सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट सांगितला. कु. रूपाली कुवर हिने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. रोहित सुरती याने महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य सांगितले. रूपाली सरदार, भावना गायकवाड, दिपाली मराठे, राज भोई, रोहित भोई, दामिनी भोई, दुर्गेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष कुमारी अर्चना भोईने आपल्या मनोगत वरील तिनही महापुरुषांचे जीवन कार्य सांगून आज माझ्या शाळेने मला मुख्याध्यापिका होण्याचा मान दिला मला खूप मनस्वी आनंद झाला. आज शिक्षकाची भूमिका बजावत असताना खूप अनुभव आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग १० वी चा विद्यार्थी नयन साळुंखे तर आभार रूपाली कुवर हिने मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस एन कोळी, पी डी पाटील यांनी मार्गदर्शन केले.

0/Post a Comment/Comments