धरणगाव शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत माहिती अधिकार कायदा दिनानिमित्त व्याख्यान व चर्चासत्र संपन्न


माहिती अधिकार हे नागरिकांना मिळालेले एक प्रभावी शस्त्र; राजेंद्र वाघ


कायद्याची प्रभावी अंमलबजावणीने लोकशाही अधिक बळकट होईल; प्रा. सतिष शिंदे 


माहिती अधिकार कायदा सर्वांसाठी हिताचा; प्राचार्य मराठे 



(धरणगाव प्रतिनिधी)  धरणगाव : शहरातील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधत व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करून "माहिती अधिकार कायदा दिन २८ सप्टेंबर" उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती अधिकार दिन अंतर्गत डी बी वाघ सर यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले व माहिती अधिकार कायदा सर्वांसाठी हिताचा आहे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य एम ए मराठे होते. कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून माहिती अधिकार कायदा महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांसह आरटीआय धरणगाव तालुकाध्यक्ष प्रा.सतिष शिंदे होते. प्रमुख अतिथी भरत शिंपी होते. कार्यक्रमाच्या तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर आरटीआय चे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार सतिष शिंदे यांनी माहिती अधिकाराबाबत सांगितले की, २८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन का म्हणून साजरा करण्यात येतो. नागरिकांना शासन दरबारी नेमके काय चाललंय, हे समजून घेण्याचा माहितीचा अधिकार सर्वांना मिळालेला आहे. माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व सकल जनांना पटावे म्हणून आपल्या सर्वांसाठी हा कायदा आहे. माहिती अधिकार हे नागरिकांच्या हाती मिळालेले एक प्रभावी शस्त्र आहे त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला नवीन पिढीला तो माहित नाही. दुर्दैवाने माहितीच्या अधिकाराबाबत पाहिजे तेवढी जनजागृती अजूनही झालेली नाही. म्हणून प्रत्येकांनी माहिती अधिकार कायदा समजून घेतल्याने लोकशाही बळकट होण्यास मदत होईल असेही श्री. शिंदे यांनी मनोगतातून सांगितले. तद्नंतर मा.अधि.कायदा महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, एकविसाव्या शतकात माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जनतेला प्रशासकीय कारभाराची माहिती सहजगत्या मिळणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती मिळविणे हा तुमचा-आमचा, सर्वांचा मुलभूत हक्क व अधिकार असून, "समवृध्द लोकशाहीचा तो पाया आहे." म्हणनूच शासकीय कारभारात, प्रशासन यंत्रणेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि खुलेपणा असणे आवश्यक आहे. जनतेच्या मुलभूत अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि हा अधिकार त्यांना परिणामकारकरित्या वापरता यावा म्हणून महाराष्ट्र राज्याने, माहिती अधिकाराचा अध्यादेश व त्या खालील नियम, राज्यभर २३ सप्टें, २००२ पासून लागू केला होता. केंद्र शासनाने १५ जून २००५ रोजी माहितीचा अधिकार कायदा लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने १२ ऑक्टो,२००५ ला लागू झाला. सदर मा.अ.कायदा सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा, त्याचप्रमाणे अनेक प्रकरणांमध्ये प्रशासकीय त्रुटीमध्ये माहितीच्या अधिकार आहे. तसेच, कायद्यातील तरतुदीनुसार माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या नागरिकास साध्या कागदावर दहा रुपयांचे तिकीट चिकटवून अर्ज करता येतो. तसेच, माहिती अधिकार कायद्याचा कुणी दुरुपयोग करत असेल, तर त्याबाबत तक्रार करावी. असेही आवाहन राजेंद्र वाघ यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना आपल्या प्रबोधनात्मक मनोगतातून माहिती अधिकाराबाबत माहिती देत नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य एम ए मराठे यांनी सांगितले की, आमच्या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करून जागृतीसाठी वक्तृत्व, निबंध, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चर्चासत्र यासह समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करीत असतो. त्याचप्रमाणे माहिती अधिकाराच्या वापर, कार्यालयीन कामकाजाविषयी पारदर्शकता कशी निर्माण करता येईल, व माहिती अधिकाराचा वापर घटनात्मक पद्धतीने करून समाज पद्धतीने करून जनजागृती करण्याबाबत प्राचार्य मराठे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सांगितले. याकरिता माहिती अधिकार कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, याच हेतूने शहर व परिसरातील आरटीआय चे पदाधिकारी जितेंद्र महाजन, प्रा.दिपक पाटील, अवधेश बाचपाई, मेजर ज्ञानेश्वर मराठे, भरत शिंपी, प्रभाकर ठाकूर, पी डी पाटील, विकास पाटील, निलेश पवार, लूनेश्वर भालेराव हे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निरंतर प्रयत्नात असतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एन परदेशी यांनी तर आभार एस डी मेढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी आर नेरकर, एन आर कापडी मॅम, शुभांगी पाटील मॅम, जगदीश पाटील, भूषण रानवे, शिपाई लोकेश चावरे, एस आर चव्हाण, मेस्कोचे सतिष पाटील, शांताराम जाधव आदींसह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments