कृष्ण गीता नगर मध्ये गाडयांचे पेट्रोल चोरी व पल्सर गाडीचे चाक चोरीला



               भुरट्या चोरांचा उपद्व्याप वाढला 


(धरणगाव प्रतिनिधी)   धरणगाव : शहरातील गट नंबर ४७५ कृष्ण गीता नगर येथे रहिवासी तसेच महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे उपशिक्षक सुनील नारायण कोळी प्लॉट न.६२ यांच्या पल्सर गाडी क्र. MH-19 - AZ - 2994 चे मागील चाक भुरट्या चोरांनी मध्यरात्री पळविण्याचे निदर्शनास आले. त्यासोबतच समर्थ नगर मधील अनेक गाड्यांचे पेट्रोल चोरी देखील झालेले आढळली.दरवर्षी कृष्ण गीता नगर या कॉलनी मध्ये चोरांचा धुमाकूळ असतो आणि तो वाढत चाललेला आहे. मागच्या वर्षीच कॉलनिवासी तथा पत्रकार पी डी पाटील यांच्या घर फोडले होते पण कॉलनीवासीयांच्या सावधानतेने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला होता. कधी पेट्रोल चोरी, कधी गाडीचे पुढचे चाक, मागचे चाक, गाडीचे सीट अशा वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टींची चोरी दरवर्षी होत असते. यामुळे कॉलनी वासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.कृष्ण गीता नगर व समर्थ नगर येथील कॉलनीवासी यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे साहेब यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. व या भुरट्या चोरांचा शोध घेऊन यांचा बंदोबस्त करावा अशी विनंती कॉलनीवासीयांतर्फे करण्यात आली.

0/Post a Comment/Comments