कै.राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ महात्मा फुले हायस्कूल ला फिरते चषक भेट


शाळेचा माजी विद्यार्थी विनायक महाजन यांची नावीन्यपुर्ण संकल्पना 


(धरणगांव प्रतिनिधी)  धरणगांव : कै.राजेंद्र किसन महाजन यांच्या स्मरणार्थ प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार व सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींच्या उपस्थितीत फिरते चषक शाळेला भेट देण्यात आले. शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शाळेचा माजी विद्यार्थी विनायक शिवदास महाजन यांच्या संकल्पनेतून हा चषक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असेल. दरवर्षी शाळेतुन प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला हा फिरता चषक भेट देण्यात येणार आहे. यातून मुलांना देखील सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल आणि चषक मिळवण्यासाठी जास्तीत जास्त मुले अभ्यास करतील असा विश्वास आहे.याप्रसंगी कै.राजेंद्र किसन महाजन यांचे सुपुत्र चि.जितेश(सोनू) राजेंद्र महाजन, चि. तेजस (मोनू) राजेंद्र महाजन, विनायक महाजन, व महाजन परिवार आणि मित्र परिवार सोबत शाळेचे शिक्षक बंधु - भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments