धरणगावात भावसार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव व सत्कार


पारितोषिक मिळाल्याने प्रेरणा मिळते; कु. भाग्यश्री भावसार


(धरणगाव प्रतिनिधी)  धरणगांव : शहरातील भावसार समाज पंच भवनात अखिल महाराष्ट्र भावसार  समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष झेंडू भावसार यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाध्यक्ष सुभाष नामदेव भावसार होते. प्रमुख अतिथी म्हणून अखिल महाराष्ट्र भावसार समाजाचे अध्यक्ष अरुण रामप्रसाद भावसार, सचिव चंद्रशेखर भावसार, मनोहर भावसार होते. सत्कारमूर्ती कु.कोमल लक्ष्मीकांत भावसार, भाग्यश्री दिपक भावसार, वैष्णवी निलेश भावसार, श्रीकांत संजय भावसार, प्रथमेश राजेंद्र भावसार आदी यशवंतांना अरुण भावसार, चंद्रशेखर भावसार, मनोहर भावसार आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, करंडक व रोख बक्षीस भेट देऊन सन्मान केला. समाजाच्या वतीने अतिथींच्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्ती कोमल भावसार, भाग्यश्री भावसार, वैष्णवी भावसार, श्रीकांत भावसार, प्रथमेश भावसार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कु. भाग्यश्री भावसार हिने मनोगतात सांगितले की, अभ्यासाने मन, मेंदू आणि मस्तिष्काची एकाग्रता वाढते. विकासाच्या व अर्थकारणाच्या दिशा बदलण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. यासोबत स्पर्धात्मक शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे असेही भाग्यश्री भावसार हिने मनोगतात सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय रणछोड भावसार यांसह गोपीचंद भावसार, सुधीर भावसार, शाम भावसार, राजेंद्र भावसार, दिपक भावसार, सागर भावसार, सचिन भावसार आदी समाजबांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सुभाष भावसार यांनी तर आभार राजेंद्र मोतीलाल भावसार यांनी मानले.

0/Post a Comment/Comments