पुणे : भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड याच्या संयुक्त विद्यमाने २४ सप्टेंबर २०२३ सायं ५ वाजता रविवार रोजी पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे मैदान आरटीओ ऑफिस शेजारील मैदानावर ऐतिहासिक सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनात सत्यशोधक समाज स्थापने मागील उद्देश,विचारधारा व आजची प्रासंगिकता – एक गंभीर चिंतन.सत्यशोधक समाजाचे पुनर्जीवन करणे हीच व्यवस्था परिवर्तनाची पूर्वशर्त होय. एक गंभीर मंथन. अश्या विषयांवर चर्चा होणार आहे.सत्यशोधक संमेलनाचे उद्दघाटक राष्ट्रवादीचे सर्वेसर्व मा.शरदचंद्रजी पवार साहेब व मुख्य अतिथी संभाजी ब्रिगेड समाजिकचे मा.प्रवीणदादा गायकवाड, मा. मा.म.देशमुख, मा.बाबा आढाव, विशेष अतिथी म्हणून आमदार रोहितदादा पवार, मा.व्ही. व्हीं जाधव, मा.वासंती नलवाडे, विठ्ठल सातव, मा.डॉ.जे.के.पवार,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा व बामसफचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब उपस्थित राहणार आहेत.तसेच राष्ट्रपिता जोतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना जो उद्देश निर्धारित केला होता त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी त्यांनी बहुजन समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेतले होते. बहुजन समाज हा धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या गुलाम होता.... या गुलामीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून एक वैचारिक आंदोलन उभे केले होते. त्यांच्या निर्वाणा नंतर सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, छत्रपती राजषी शाहू महाराज, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांनी हे आंदोलन चालवले. विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुलेंना सामाजिक गुरु मानून हे आंदोलन तहहयात चालवले. वर्तमान परिस्थितीत या आंदोलनाची प्रासंगीकता राष्ट्रीय पातळीवर आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करत असताना फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील अनुयायांना आम्ही सहर्ष आमंतरित करत आहोत. बहुजन समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड सामाजिक कडून करण्यात आले आहे.
Post a Comment