पिके आणि शेतकरी संपण्याची वेळ आली आहे.साहेब
चोपडा : पावसाळा सुरु होऊन अडीच महिने उलटले अजूनही काही हवा तसा पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासायला लागली आहे. काही ठिकाणी तर टँकरने पाणी सुद्धा पोहोचवले जात आहे. असेच जळगावमधील चोपडा तालुक्याची परिस्थिती तोंडाशी आली आहे. चोपडा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने चोपडा तालुका दुष्काळ जाहीर करावा व खरीप हंगामाचे पिकं वाचविण्यासाठी सरकारने सुरू केलेली लोड शेडिंग बंद करावी अशी मागणी चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे करण्यात आहे.माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, यावेळी दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे आणि लोड शेडींग बंद झालीच पाहिजे अशा घोषणा त्यांनी केल्या. यावेळी माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, घनश्याम पाटील माजी पंचायत समिती सभापती डी पी साळुंखे डी पी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे म्हणाले, पावसाची वाट पाहता पाहता पिकांची वाट लागतेय. अशा परिस्थितीमध्ये लोडशेडींग अत्यंत गंभीर असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पिके आणि शेतकरी संपण्याची वेळ आली आहे.
Post a Comment