(धरणगाव प्रतिनिधी) धरणगाव : सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाज संघाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी सत्यशोधक नगरी,जय शंकर लॉन्स,औरंगाबाद रोड,जेजुरकर मळा, नाशिक येथे संपन्न होणार आहे.या ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन सत्यशोधक राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख उपस्थिती मान्यवर म्हणुन महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ,सत्यशोधक गणपत दादा मोरे यांचे नातू विश्वासराव मोरे ,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र व साधने समितीचे माजी सचिव डॉ.राजेंद्र कुंभार ( कोल्हापुर ),प्रमिती हरी नरके , ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, सत्यशोधक चळवळीचे संशोधक तथा विचारवंत लेखक जी.ए.उगले ( पैठण ) उपस्थित राहणार आहेत.पहिल्या सत्राचा विषय " संशोधकांनी सत्यशोधक प्राध्यापक हरी नरके यांच्याकडून काय प्रेरणा घ्यावी ? ", दुसऱ्या सत्राचा विषय - " सत्यशोधक समाजाची चळवळ काळाची गरज " तिसऱ्या सत्राचा विषय " वर्तमानातील शेतकरी,शैक्षणिक धोरण व त्यात सत्यशोधक चळवळीची भूमिका " या तिन्ही सत्रात प्रमुख वक्ते, विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत.सकाळ सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वसंतराव गीते, डॉ.डी.एल.कराड,डॉ.भुषण कर्डीले,प्रा.कविताताई कर्डक,प्रबोधनकार मारुती काका जोयशी तसेच विशेष निमंत्रित अँड.सुभाष निकम,श्रीराम मंडळ मंडलिक, बाजीराव अण्णा तिडके,सत्यशोधक सुरेश दादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत.दुसऱ्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ॲड.धनराज वंजारी,उत्तम नाना पाटील, मनोजभाऊ घोडके,करुणासागर पगारे तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.आर.जी.भोंग उपस्थित राहणार आहेत.तिसऱ्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून डॉ.दत्ताजीराव जाधव, बापूसो.सुरेश महाजन,प्रकाशभाऊ लोंढे,रायगड येथील प्रा.सुनील देवरे ,जळगाव येथील विश्वासराव पाटील उपस्थित राहणार आहेत.समारोप सत्रात पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे,अ.भा.म.फुले समता परिषद महाराष्ट्र सरचिटणीस समाधान जेजुरकर ,मुंबई येथील कुणबी युवा अध्यक्ष माधव कांबळे उपस्थित राहणार आहेत. या ऐतिहासिक अधिवेशनाचे कार्याध्यक्ष आप्पा जगताप,संयोजक अशोक सोनवणे,सहसंयोजक भाऊसाहेब जाधव तसेच सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरविंद खैरनार ,सचिव डॉ.सुरेश झाल्टे,सहसचिव सुनील देवरे , खजिनदार नरेंद्र जाधव आणि समस्त पदाधिकारी कार्यकर्ते सत्यशोधक समाज संघ यांनी महाराष्ट्रातील सत्यशोधकांना या नाशिक येथील अधिवेशनास उपस्थित राहून या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले आहे. ऐतिहासिक राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २३ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता " मी जोतीराव फुले बोलतोय " ह्या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण नटश्रेष्ठ कुमार आहेर ( पुणे ) करणार आहेत.तरी महाराष्ट्रातील सर्व शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर विचारधारेचे अभ्यासक,विचारवंत यांनी सहकुटूंब सहपरिवार तसेच युवा विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार, अधिवेशन प्रसिद्धी समिती सदस्य पी.डी.पाटील ( धरणगाव ) व विजय लुल्हे ( जळगाव ) यांनी केले आहे.
सत्यशोधक समाज संघ आयोजित सत्यशोधक समाजाचे ४१ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन नाशिक येथे होणार

Post a Comment