(धरणगाव |प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना तृणधान्य (मिलेट) जागरूकता निर्माण व्हावी या साठी धरणगाव तालुका कृषि विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत तालुकास्तरीय पाककला स्पर्धा आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री खुर्द येथे आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमपूजन संपन्न होत कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून धरणगाव तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने यांनी उपस्थितांना तृणधान्य , सकस आहार , भारतीय उत्पादने वापर यावर दीर्घायुष्य भविष्य साठी उपाय यावर प्रतिपादन केले. कार्यक्रम प्रसंगी , चंद्रकांत देशमाने (धरणगाव तालुका कृषी अधिकारी) , पल्लवी देशमाने मॅडम , प्रदीप चव्हाण (कृषी अधिकारी धरणगाव ) प्रमोद चौधरी ( उपाध्यक्ष वेदमाता गायत्री बहू संस्था पिंप्री ) , विनोद चौधरी सर ( सचिव वेदमाता गायत्री बहू संस्था पिंप्री ) , ए आर कोळी (कृषी पर्यवेक्षक ) , किरण देसले (कृषी पर्यवेक्षक ) , यशोदाताई चौधरी ( संचालिका वेदमाता गायत्री बहू संस्था पिंप्री ) , रत्नाताई चौधरी , वैशाली चौधरी मॅडम (मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक शाळा पिंप्री) , संदिप सपकाळे सर (मुख्याध्यापक आदर्श माध्यमिक शाळा पिंप्री ) , पद्माकर पाटील , विमल सुरावर , ज्ञानेश्वर कोळी , गजानन मोरे , आदीत्य महाजन (कृषी सहायक)आदी उपस्थित होते. तालुकास्तरीय पाककला स्पर्धेत शालेय विद्यार्थी , अंगणवाडी सेविका , मदतनीस , बचत गट महिला , आदींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला . स्पर्धेत तृणधान्य युक्त असंख्य पदार्थांची मेजवानी पहावयास मिळाली. यावेळी सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. परिसरातील नागरिक , माता - पालक , यांनी कार्यक्रमास उपस्थिती दिली.यशस्वीतेसाठी आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री येथील सर्व शिक्षक ,शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले. सूत्रसंचालन आर एस पाटील सर यांनी केले तर आभार विलास पाटील सर यांनी मानले.
Post a Comment