चिंचपुरा येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न



गावातील नागरिकांनी सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने करावेत ; डॉ.सुरेश झाल्टे


(धरणगांव प्रतिनिधी)  धरणगांव : तालुक्यातील चिंचपुरा या गावात सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी डी पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचपुरा गावाचे सरपंच कैलास पांडुरंग पाटील होते. प्रमुख मार्गदर्शक सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी.डी.पाटील, एच.डी.माळी, सरपंच अरूण शिरसाट, तुषार पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाचे माल्यार्पन करून पूजन करण्यात आले.चिंचपूर गावाच्या वतीने सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. डॉ.सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास उलगडला. सत्यशोधक समाज संघाचे महत्त्व सांगून सत्यशोधक विचारांवर चालण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करून प्रत्येकाने सत्यशोधक विधीप्रमाणे विधी करावेत असे आवाहन केले. पी.डी. पाटील यांनी येत्या २४ सप्टेंबरला नाशिक येथे राज्यस्तरीय अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी आम्ही गाडी करून नाशिक येथे अधिवेशनाला नक्की येऊ असे आश्वासन दिले.याप्रसंगी चिंचपूरा गावातील ज्येष्ठ नागरिक श्रीराम बंडू पाटील, मन्साराम देवराम पाटील, श्रावण रामा पाटील, गोकुळ नामदेव पाटील तसेच गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक एच.डी.माळी यांनी तर आभार पोलीस पाटील किरण पाटील यांनी मानले. बैठक यशस्वीतेसाठी चिंचपुरा गावातील सर्व तरुण मित्रांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments